तीन प्रधान सचिव मेळघाटात प्रत्यक्ष पाहणी करणार

तीन प्रधान सचिव मेळघाटात प्रत्यक्ष पाहणी करणार

Published on

तीन प्रधान सचिव मेळघाटात प्रत्यक्ष पाहणी करणार
कुपोषणाप्रकरणी उच्च न्यायालयात सचिवांकडून माहिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तीन प्रधान सचिव मेळघाट आणि आसपासच्या परिसराला येत्या ५ डिसेंबरला प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती सचिवांकडून मंगळवारी (ता. २५) उच्च न्यायालयाला देण्यात आली.

मंगळवारी न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी सार्वजनिक आरोग्य, महिला बालकल्याण आणि आदिवासी विभागाचे तीनही सचिव ५ डिसेंबरला मेळघाटला जाऊन तेथील समस्यांची, प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी करतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक यांनी न्यायालयाला दिली. त्याच वेळी सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागांच्या सचिवांशी संवाद साधू शकत नसल्याचे सागितले. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागातील उपसचिवपदापेक्षा कमी श्रेणी नसलेला अधिकाऱ्यांना जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यासोबतच जल आणि स्वच्छता विभागाचे उपसचिवांसह प्रकल्प अधिकारी (मेळघाट), धारणी अधिकारी, उप-वन संरक्षकांसह याचिकाकर्त्यांनाही त्यांच्यासमवेत जाण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तत्पूर्वी, याचिकाकर्त्या बर्मांच्या वतीने वकील जुगल गिल्डा यांनी मेळघाटातील काही मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
---------------------
मोखाडा जिल्ह्यातील घटनेची दखल
मोखाडा येथील एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिकाचालकाने अर्धा रस्त्यातच सोडून दिले. त्यामुळे या महिलेला बाळासह दोन किमी पायपीट करावी लागल्याच्या घटनेची न्या. डेरे यांनी दखल घेतली. एका जिल्ह्याची अन्य जिल्ह्याशी तुलना करू नका, असे राज्य सरकारला सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com