वसईत क्लोरीन सिलेंडर लिक होऊन वायुगळती
वायुगळतीमुळे एकाचा मृत्यू, १९ बाधित
वसईत क्लोरीन सिलिंडर लीक, अनेकांना त्रास
नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) ः वसई पश्चिम दिवानमान परिसरात क्लोरीनचा सिलिंडर लीक झाला. या वायुगळतीमुळे परिसरात श्वास घेण्यास त्रास झाल्याने एकाचा मृत्यू झाला, तर १९ जण बाधित झाले आहेत. यात चार जण वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आहेत. सर्व बाधितांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २५) दुपारी चार वाजता ही दुर्घटना घडली.
देव परडीया (वय ५९) असे मृताचे नाव आहे. ते वसई पश्चिमेच्या दिवानमान परिसरातील रश्मी प्लाझा या इमारतीमध्ये राहत होते. वसई पश्चिमेच्या दिवानमान परिसरात पाण्याची टाकी आहे. त्या टाकीच्या खाली हा क्लोरीनचा सिलिंडर होता. अचानक परिसरामध्ये हिरव्या रंगाचा वायू पसरला आणि नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले. तसेच अनेकांना उलट्या होऊ लागल्या. नागरिकांना ताबडतोब स्थलांतरित करण्यात आले. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि माणिकपूर पोलिसांनाही याचा त्रास झाला. एक तासानंतर सिलिंडर डिस्ट्रॉय करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

