मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण :
फहीम अन्सारीच्या नोकरीवर निर्बंध
राज्य सरकारची न्यायालयात माहिती
मुंबई, ता. २५ : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला या घटनेशी संबंधित खटल्यातील निर्दोष सुटका झालेला फहीम अन्सारी हा पोलिसांचे ना-हरकत किंवा चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता नसलेली कोणतीही नोकरी किंवा काम करू शकतो, अशी माहिती राज्य सरकारने मंगळवारी (ता. २५) उच्च न्यायालयात दिली. राज्य सरकारच्या खुलाशामुळे अन्सारीला रिक्षा परवाना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.
न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी फहीम कोणत्या नोकऱ्या करण्यास पात्र नाही याची यादीच सहाय्यक सरकारी वकील अमित पालकर यांनी न्यायालयात सादर केली. या यादीनुसार पोलिसांकडून ना-हरकत किंवा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असलेली कोणतीही नोकरी किंवा काम फहीम करू शकत नाही. तथापि, हे प्रमाणपत्र आवश्यक नसलेले कोणतेही काम करण्याची त्याला मुभा असेल, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. सरकारने सादर केलेल्या यादीत सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, मुंबई-ठाण्यासह सर्व महानगरपालिका, परिवहन विभाग, सर्व शाळा आणि महाविद्यालये आणि सुरक्षा रक्षक कंपनीत फहीम नोकरी करू शकत नाही. या सगळ्या नोकऱ्यांसाठी पोलिसांचे ना-हरकत किंवा चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे. रिक्षासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी फहीमने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

