मृत महिलेचा मारेकरी जेरबंद

मृत महिलेचा मारेकरी जेरबंद

Published on

महिलेच्या खूनप्रकरणी एकाला अटक
ठाणे, ता. २५ ः बॅगेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. प्रियांका विश्वकर्मा (वय २५) असे तिचे नाव आहे. तर तिच्या खूनप्रकरणी विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (वय ५०) याला पोलिसांनी अटक केली आहे. आपसात झालेल्या भांडणातून महिलेचा खून करण्यात आला. त्यानंतर मारेकऱ्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एक दिवस मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून घरात ठेवला होता; मात्र दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्यावर रविवारी (ता. २३) रात्री ती बॅग खाडीत फेकून दिली होती. देसाई गावाच्या पुढील खाडीपुलाखाली एका ट्रॉली बॅगेमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह सोमवारी (ता. २४) आढळला होता. याप्रकरणी शिळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मारेकरी हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून सध्या तो देसाई गावात राहतो. मृत महिला ही त्याच्यासोबत मागील पाच वर्षांपासून राहत होती. त्या दोघांमध्ये शुक्रवारी (ता. २१) भांडण झाले होते. त्यातून त्याने तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास शिळ डायघर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com