कोपरा गावात मद्यपींचा उच्छाद

कोपरा गावात मद्यपींचा उच्छाद

Published on

कोपरा गावात मद्यपींचा उच्छाद
स्वच्छतागृहाच्या छतावर दारूच्या बाटल्या
खारघर, ता.२६ (बातमीदार): खारघरमधील कोपरा गावात तळीरामांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी सार्वजनिक स्वच्छता गृहाच्या छतावर दारूच्या पार्ट्या होत असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ हैराण आहेत.
पनवेल महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी खारघरमधील बेलपाडा, कोपरा आणि खारघर गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामे होत होती. मात्र, पालिका अस्तित्वात आल्यानंतर नागरी सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेवर आली. मात्र, पालिका प्रशासनाकडून योग्य प्रकारे देखभाल केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. कोपरा गावात दोन सार्वजनिक स्वच्छता गृह आहे. येथील एका स्वच्छता गृहासमोर महिला, पुरुष असा उल्लेख नसल्याने पाण्याची टाकी कोरडी पडली आहे. तर सुधागड शाळा लगत असलेल्या स्वच्छतागृहाच्या छतावर दारुच्या बॉटल्या पडून असल्याने रात्रीच्या वेळी येथे मद्यप्राशन करत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
--------------------------------
नाराजीचा सूर
कोपरा, बेलपाडा गावात भाडेकरूंची संख्या अधिक आहे. या सार्वजनिक स्वच्छताग्रहाचा उपयोग भाडेकरू करीत असल्यामुळे राजकीय, शासकीय अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com