

उरणमध्ये अपक्षांचे तगडे आव्हान
निवडणूक प्रचारासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर
उरण, ता. २६ (वार्ताहर) ः नगर परिषदेच्या निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडी, शिंदे गट, भाजपने कार्यकर्त्यांची फौज मैदानात उतरवली आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारांनी एआयसारख्या तंत्रज्ञानातून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
उरण नगर परिषदेची २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. त्या वेळी एका नगराध्यक्षसह १८ नगरसेवक होते. तब्बल नऊ वर्षांनंतर एका नगराध्यक्षासह २१ नगरसेवकांसाठी २ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सभांमधून, संपूर्ण परिसरात रॅली काढून, घरोघरी जाऊन भेटी घेऊन, पहाटे फेरफटका मारणाऱ्या नागरिकांच्या भेटींसाठी जाहिरात फलक, ध्वनिमुद्रित संदेशांबरोबर समाजमाध्यमांचा वापर केला जाणार आहे. याचबरोबर एआयचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
------------------------------
तिरंगी लढत
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी लढत होत आहे. प्रचाराला गती वाढली आहे. प्रत्येक पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे बाजी कोण मारणार, याची उत्सुकता लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.