आरेत १५ कोटींच्या सुशोभीकरण कामांचे वायकर यांच्या हस्ते भूमिपूजन
आरेत १५ कोटींच्या सुशोभीकरण कामांचे वायकर यांच्या हस्ते भूमिपूजन
जोगेश्वरी, ता. २६ (बातमीदार) ः खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते आरेमध्ये सुमारे १५ कोटी रुपयांच्या सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आरे तलावासाठी मंजूर निधी वनविभागाची परवानगी न मिळाल्याने जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर आरेतील इतर पाच सुशोभीकरण प्रकल्पांसाठी वळवण्यात आला आहे.
या कामांत छोटा काश्मीर गार्डन (टप्पा २ व ३), वीर सावरकर उद्यान, न्यूझीलंड हॉस्टेल परिसर व गणेश तलाव परिसर सुधारणा यांचा समावेश आहे. आरेच्या विकासासाठी गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्याचे वायकर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिपूजन केलेल्या ६७ कोटींच्या प्रकल्पातील पूर्ण झालेल्या रस्त्यांचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमास आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिपूरकर, अभियंता प्रशाली दिघावकर, प्रियांका आंबोळकर, माजी नगरसेविका रेखा रामवंशी, मनीषा वायकर, दीप्ती वायकर-पोतनीस, शाखाप्रमुख बाळकृष्ण जोशी आदींची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

