सदाशिव सातघरे संघाचा दमदार विजय

सदाशिव सातघरे संघाचा दमदार विजय

Published on

सदाशिव सातघरे संघाचा दमदार विजय
ठाणे, ता. २५ (बातमीदार) ः तुकाराम सुर्वे स्मृती दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत सदाशिव सातघरे संघाने पहिल्या सामन्यातच दमदार विजय नोंदवला. त्यांनी अनंत धामणे संघाला आठ फलंदाज राखून पराभूत केले. विजयाचे पाच गुण आपल्या खात्यात जमा केले. रुद्र गिरीच्या सामन्यातील आठ बळी आणि तन्मय मालुसरे व निरव बोरकरच्या अर्धशतकांमुळे संघाचा विजय ठळक झाला.
सदाशिव सातघरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रुद्र गिरीने २४ धावांत पाच तर अवनीश नाखवाने २८ धावांत तीन बळी घेत प्रतिस्पर्ध्यांचा डाव थांबवला. सार्थ पटेलच्या नाबाद ९० धावांमुळे अनंत धामणे संघाने १३९ धावा केल्या. त्यानंतर तन्मयच्या ५२ धावांच्या जोरावर सातघरे संघाने पहिल्या डावात १५७ धावा करून १८ धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात सोहम लाडच्या ५६ धावांमुळे धामणे संघाने नऊ बाद १६२ धावा केल्या. रुद्रने तीन तर आयुष सर्वेने ४३ धावांत चार बळी घेत संघाचा डाव रोखला. निरव बोरकर ७१ आणि शायन शेख ३० धावा करत विजयासाठी आवश्यक १४१ धावा पार केल्या आणि संघाने सामन्यात प्रभावी विजय मिळवला. सदाशिव सातघरे संघाचा हा विजय त्यांच्या संघभावना, कुशल फलंदाजी आणि जबरदस्त गोलंदाजीचा परिणाम ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com