रिक्षात राहिलेले ५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने परत
रिक्षात विसरलेले पाच तोळ्यांचे सोने परत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : नौपाडा पोलिसांना रिक्षात विसरलेल्या बॅगेसह पाच तोळे सोन्याचे दागिने परत मिळवून देण्यात यश आले आहे. या पोलिसांच्या या तप्रतत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे..
कल्याणमधील खडकपाडा येथील सुभाष कसबे हे काही कामानिमित्त मंगळवारी (ता. २५) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात आले होते. तेथून ते रिक्षाने ठाणे स्थानकाला जाण्यासाठी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रिक्षात बसले. स्थानकात पोहोचताच सुभाष घाई गडबडीत बॅग रिक्षातच विसरले. काही वेळाने बॅग नसल्याचे लक्षात येताच, कसबे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तात्काळ नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक तपास करून रिक्षाचा नंबर शोधून हरवलेला मुद्देमालाची बॅग सुभाष कसबे यांच्याकडे सुपूर्द केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

