दहा वर्षांचा प्रणित देतोय वंचित मुलांना शिक्षणाचे धडे
१० वर्षांच्या प्रणीतचा ‘पढाओ इंडिया’ उपक्रम
वंचित मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे
प्रभादेवी, ता. २६ : बोरिवली येथील विटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १० वर्षांच्या प्रणीत धारेवा या चिमुकल्याने आपल्या कार्याची मोठी छाप पाडली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात प्रणीतने ‘पढाओ इंडिया’ या सामाजिक उपक्रमातून २,००० हून अधिक वंचित विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकले आहे.
कोरोना महामारीतील लॉकडाउनमध्ये म्हणजे केवळ सहा वर्षांचा असताना ऑनलाइन शिक्षणाची सोय नसलेल्या मुलांची अडचण प्रणीतने जाणली. या सहानुभूतीच्या बळावर त्याने आई-वडिलांच्या मदतीने ‘पढाओ इंडिया’ची सुरुवात केली. याअंतर्गत प्रणीतसारखे मोठे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतात आणि लहान मुलांना ऑनलाइन मार्गदर्शन करतात. इंग्रजी, गणित, विज्ञान यासोबतच मूल्य शिक्षण आणि सहानुभूतीचे धडेही दिले जातात. आठवड्यातून एकदा दोन तास प्रत्येक स्वयंसेवक पाच मुलांना शिकवतो. तसेच ५० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि कौतुकाची चिन्हे देऊन प्रोत्साहित केले जाते.
प्रणीतच्या मते यामुळे केवळ शिक्षणच मिळत नाही, तर शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्यासही मदत होते. त्याच्या या अलौकिक कार्यामुळे प्रणीतला आंतरराष्ट्रीय शिक्षण पुरस्कारासह महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून सत्कार यांसारख्या मोठ्या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. एका छोट्या वैयक्तिक प्रयत्नातून सुरू झालेला हा प्रवास आज देशभरातील वंचित मुलांसाठी शिक्षणाचा आधारवड बनला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

