

खड्डेमुक्तीसाठी आयुक्त सरसावले
१५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
वाशी, ता. २६ (बातमीदार)ः नवी मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहरातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १५ दिवसांत खड्डेमुक्तीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
बैठकीदरम्यान आयुक्तांनी नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारी, सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचा आढावा तसेच पाहणीदरम्यान लक्षात आलेल्या त्रुटींची सविस्तर चर्चा केली. अनेक मुख्य मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांना विविध अडचणी उद्भवत आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अभियंता विभागांना क्षेत्रनिहाय दुरुस्ती आणि पुनर्वसनाची कामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.