एकविरा देवीच्या दर्शनाची ओढ
एकवीरा देवीच्या दर्शनाची ओढ
नवी मुंबईतील मानाची पालखी ४ जानेवारीला निघणार
नेरूळ, ता. २६ (बातमीदार) ः जुईनगर येथील गावदेवी युवा मित्र मंडळाची मानाची पालखी गुरुवारी (ता. २७) कार्ला येथील एकवीरा देवस्थानाकडे मार्गस्थ होणार आहे. या पालखीचे यंदा १४वे वर्ष असून दोन हजारांहून अधिक भाविक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
चारही सागरी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आई एकवीरा भक्त पालखी सोहळ्यामध्ये भक्तिभावाने सहभागी होतात. चारदिवसीय पालखी सोहळ्यात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम वस्तीच्या ठिकाणी साजरे होतात. जुईनगरहून निघताना तब्बल ५०० हून अधिक वादक ब्रास बँड वादनाने पालखीला मानवंदना देतात. बायांची गाणी, आगरी-कोळी पारंपरिक गीतांचे विविध कार्यक्रम केले जातात. तर कार्ला देवस्थान येथे जल्लोष आईच्या पालखीचा हा ऑर्केस्ट्रा होतो. या कार्यक्रमात १०० हून अधिक कलाकार सहभागी होतात.
-------------------------------
महाराष्ट्रात ओळख
पालखीतील १५० स्वयंसेवक पदाधिकारी दोन महिने अहोरात्र मेहनत घेतात. पालखीचे संस्थापक अध्यक्ष शैलेश भोईर यांनी २०१२ साली सुरू केलेली पालखी पदयात्रा नवी मुंबईतील मानाची पालखी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

