लाखो भीम अनुयायांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

लाखो भीम अनुयायांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

Published on

उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये ६ डिसेंबरला होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो भीम अनुयायांच्या आगमनाची तयारी वेगाने सुरू आहे. मात्र, बाबासाहेबांच्या स्मारक परिसरातील अपूर्ण दुरुस्ती कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुतळ्याभोवती सांडपाणी वाहिनीच्या खोदकामामुळे रस्ता खड्डेमय झाल्याने भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी प्रशासनाला निवेदन देत तत्काळ रस्ता पुनर्बांधणीची मागणी केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन मोठ्या श्रद्धा-भावनेने साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीही सुभाष टेकडी, उल्हासनगर ४ पूर्व येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी राष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने येणार आहेत. मात्र, पुतळा परिसरात सांडपाणी वाहिनीचे खोदकाम करण्यात आल्यानंतर रस्त्याची पुनर्बांधणी करण्यात आली नाही. सध्या संपूर्ण परिसरात खड्डे, चिखल व उंच-सखल रस्ता अशी गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे विशेषतः मोठ्या गर्दीत चालणे कठीण होण्याची व अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चंदनशिव यांनी कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, उल्हासनगर-३ कार्यालयात भेट देऊन यासंदर्भात अधिकृत अर्ज सादर केला. अर्जामध्ये ६ डिसेंबरपूर्वी परिसरातील सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करून भाविकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.

भारताच्या संविधान निर्माता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी देशभरातून येणाऱ्या भीम अनुयायांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. खोदकाम करून रस्ता पूर्ववत न केल्याने भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे.
- ॲड. प्रशांत चंदनशिव, सामाजिक कार्यकर्ते

उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसरात सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com