सानपाडा गावात समस्यांचे घर
सानपाडा गावात समस्यांचे घर
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ हैराण
जुईनगर, ता.२६ (बातमीदार): राज्य शासनाने दुसरी मुंबई उभारण्यासाठी १९७० मध्ये सिडको महामंडळाची स्थापना केली. १९७२ साली ग्रामस्थांच्या जमिनींचे हस्तांतरण करून सिडकोने शहर उभारले. पण १९९५ साली पालिका आल्यानंतरही विविध समस्या येथील ग्रामस्थांना भेडसावत आहेत.
गावठाण विस्ताराची मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करत आहेत. गावाच्या सभोवताली विकास झाला असला तरी गावांमध्ये विकास नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. सानपाडा गावातील ग्रामस्थांना प्रचिती येत आहे. धर्मवीर आनंद दिघे व्यायाम शाळेसमोरील रस्त्याची दुरवस्था आहे. रस्त्यालगत काही ठिकाणी डेब्रिज टाकण्यात आले आहेत. सानपाडा गावातील बकालपणा वाढला आहे. डासांच्या प्रादुर्भावाने साथीच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. उघड्यावरील विद्युत वाहिन्यांमपळे वांरवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून महापालिका स्वच्छतेचा पुरस्कार घेत असताना सानपाडा गावातील दयनीय अवस्थेमुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

