रस्त्यांवर तृतीयपंथीयांचा धिंगाणा
रस्त्यांवर तृतीयपंथीयांचा धिंगाणा
ठाणे-खारघर मार्गावर रात्री उशिरापर्यंत वावर
वाशी, ता.२६(बातमीदार)ः ठाणे-बेलापूरपासून खारघर मार्गावर तृतीयपंथीयांचा वावर वाढला आहे. रस्त्याच्या कडेला अश्लिल हावभाव करत अनैतिक प्रकार सुरु असताना पोलिसांकडून कानाडोळा होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ठाणे-बेलापूर, बेलापूर-खारघर मार्ग प्रवासी, खासगी वाहनचालक, मालवाहक कंटेनरमुळे २४ तास गजबललेला असतो. ठाणे-वाशी-पनवेलकडे जाणारे नागरिक शेवटची लोकल सुटल्यानंतर रात्री उशिरापर्यंत वाहन उपलब्ध असल्याने वाहतूक सेवेचा वापर करतात. पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रेल्वे ट्रॅकच्या मोकळ्या जागेचा आधार तृतीयपंथीय घेत आहेत. दिघा-ऐरोली नाका, ऐरोली सिमेंन्स कंपनी समोरील रस्ता, नोसील नाका ते घणसोली रेल्वे स्थानक, महापे उड्डाणपुल, जुईनगर रेल्वे स्टेशन परिसर, खारघर टोलनाका ते तळोजा सर्कल आणि सानपाडा रेल्वे स्थानक यामार्गावर संध्याकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री उशिरा १, २ वाजेपर्यंत तृतीयपंथीयांचा घोळका अश्लील हावभाव करतात.
----------------------
पोलिसांचे दुर्लक्ष
चार महिन्यांपासून या प्रकारात वाढ झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. स्थानिक पोलिस किंवा नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती अनेकवेळा देण्यात आली आहे. पण पोलिस वेळेवर पोहचत असल्याने नशेडी, मद्यपी आणि गावगुंडाचा वापर वाढल्याने प्रवासी जीवमुठ्ठीत धरुन प्रवास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

