दुबार मतदारांवरून रणकंदण
दुबार मतदारांवरून रणकंदण
उरणमध्ये पाच हजार नावे असल्याचा आरोप
उरण, ता.२६(वार्ताहर)ः नगरपरिषद निवडणुकीत दुबार, बोगस मतदारांचा मुद्दा गाजणार आहे. शहरातील एकूण मतदारांपैकी पाच हजार नावे दुबार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशभरात काँग्रेस, तर राज्यात महाविकास आघाडी, मनसेने दुबार, बोगस मतदारांच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगासमोर आक्षेप नोंदवले आहेत. उरण नगरपरिषद, उरण विधानसभा परिसरातही मतदार नोंदणीत गंभीर तफावत आहे. या संदर्भात निवडणूक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून दहा प्रभागांत मिळून पाच हजारांहून अधिक दुबार मतदारांचा आरोप केला आहे. उरण नगरपरिषद प्रभागांमध्ये मतदारसंख्या तुलनेने कमी असल्याने विजयी आणि पराभूत उमेदवारांतील मतांचे अंतरही अल्प असते. अशा परिस्थितीत दुबार किंवा बोगस मतदारांचे मतदान निकालावर परिणाम करू शकते, असा आक्षेप निवडणूक आयोगाकडे नोंदवण्यात आला आहे.
------------------------------------
कारवाईचे संकेत
उरण शहरात वास्तव्य करणारे काही मतदार आसपासच्या गावांच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मतदार यादीतही नाव ठेवून मतदान करतात. यामुळे एकाच व्यक्तीकडून विविध ठिकाणी मताधिकाराचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. पण उरण नगरपरिषद क्षेत्रात फक्त ७२१ दुबार मतदारांची नोंद असल्याचे प्रशासनाने मान्य केले असून कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

