मॉडेल इंग्लिश शाळेने केला संविधानाचा गजर
विद्यार्थ्यांकडून संविधानाचा गजर
कल्याण पूर्वेत जनजागृतीपर प्रभात रॅली
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत कल्याण पूर्व येथील मॉडेल इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालयात संविधान दिन बुधवारी (ता. २६) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाचे महत्त्व आणि नागरिकांचे कर्तव्य या मुख्य विषयावर आधारित कार्यक्रमाने शाळेचे वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते. तसेच, शाळेने जनजागृतीपर प्रभात फेरीसह विविध उपक्रमांद्वारे संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे व नृत्य सादर केले. तर, संविधान के मौलिक अधिकार या विषयावरील पथनाट्याद्वारे समाजातील नागरिकांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहोचवला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान पुस्तकाचे पूजन ॲड. प्रा. नागसेन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे आधारस्तंभ भगवान भोईर, संस्थेचे सचिव आनंद नायर, सहसचिव निलेश शिंदे व खजिनदार नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. मॉडेल कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्समध्येही शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला.
संविधानिक मूल्यांचे संवर्धन
कार्यक्रमातील प्रमुख मान्यवर व कायदे तज्ज्ञ ॲड. प्रा. नागसेन सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात संविधान वाचणे आणि समजून घेणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. हक्कांइतकेच कर्तव्यांची जाणीवही आवश्यक असून ती आपल्या समाजाला सक्षम करते, असे त्यांनी नमूद केले. सभासद महेश गायकवाड व दत्ता गायकवाड यांनीही संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांचे संवर्धन आणि सामाजिक बंधुत्वाची भावना दृढ करणे हेच या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दीष्ट आहे, असे शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

