मतदारांचा चुकीच्या प्रभागात समावेश
मतदारांचा चुकीच्या प्रभागात समावेश
उल्हासनगर मतदार यादीत घोळ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांनी निवडणुकीपूर्वीच मोठा वाद निर्माण केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निर्विवाद यादी तयार करण्याची अपेक्षा असताना, प्रत्येक प्रभागात सीमारेषेबाहेरील तब्बल २,००० ते २,५०० मतदार सामील केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर घोळामुळे केवळ मतदारांची गैरसोय होणार नाही, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक राजकारण चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेकडे प्रभागांची बिनचूक यादी प्रसिद्ध करण्याची जबाबदारी असतानाही स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोळ झाल्याचा थेट आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. याद्यांच्या विश्लेषणातून हे चित्र स्पष्ट दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत कडक भूमिका घेतली आहे. त्रुटींसाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी. सर्व चुका दुरुस्त केल्याशिवाय मतदार यादी पुन्हा प्रसिद्ध करू नये, असे त्यांनी म्हटले.
प्रभाग मर्यादेबाहेरील हजारो मतदार कृत्रिमरीत्या समाविष्ट करणे हा सरळ सरळ जनतेच्या मताधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे. शहराचा भविष्यासंबंधी निर्णय घेणारी मतदार यादी ही राजकारणाचा नव्हे तर विश्वासाचा दस्तऐवज असली पाहिजे, असे मत बोडारे यांनी व्यक्त केले आहे. मतदार यादीतील घोळ निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा संवेदनशील मुद्दा ठरण्याची चिन्हे असून, यामुळे महापालिकेला हरकती व तक्रारींचा मोठा सामना करावा लागणार आहे.
लोकशाहीची पायाभरणी ही पारदर्शक आणि निर्दोष मतदार याद्यांवर उभी असते. मात्र उल्हासनगर महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक झालेल्या मोठ्या घोळामुळे निवडणूक प्रक्रियेला धक्का बसला आहे. स्थानिक कर्मचारी व अधिकारी असूनही प्रभाग मर्यादेबाहेरील हजारो मतदार कृत्रिमरीत्या समाविष्ट करणे हा सरळ सरळ जनतेच्या मताधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करणे आणि सर्व त्रुटी दुरुस्त करूनच यादी जाहीर करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. शहराच्या भविष्यासंबंधी निर्णय घेणारी मतदार यादी ही राजकारणाचा नव्हे तर विश्वासाचा दस्तऐवज असली पाहिजे.
- धनंजय बोडारे, कल्याण जिल्हाप्रमुख, ठाकरे गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

