उत्तन-विरार सागरी सेतूचा मार्ग मोकळा
पालघर, ता. २६ ः उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला राज्य सरकारने मंगळवारी (ता. २५) मंजुरी दिली. त्यामुळे या सेतू उभारणीच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईपासून पालघरपर्यंतचा प्रवास जलद, सोपा आणि सुरक्षित होणार आहे.
किनारपट्टी भागातील संपर्क सुलभ करण्यासाठी प्रस्तावित उत्तन-विरार सागरी सेतू हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या आराखड्यासह ५८ हजार ७५४ कोटींच्या खर्चालाही मान्यता मिळाली आहे. सेतूमुळे विरार, नालासोपारा, वसई, भाईंदर, उत्तन आणि पालघर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पालघर जिल्हा मुंबई-पश्चिम उपनगरांदरम्यान थेट जोडला जाणार आहे. उत्तन-विरार सागरी सेतू हा केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
उत्तन-विरार सागरी सेतूच्या प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या करापोटी आठ हजार २३६ कोटी रुपये, प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी २,६१९ कोटी रुपये, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी २६१ कोटी असे एकूण ११ हजार ११६ कोटी रुपयांचे कर्जसाह्य बिनव्याजाने ‘एमएमआरडीए’ला दिले जाणार आहे. तर ४४ हजार ३३२ कोटींचे कर्ज उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली असून त्यासाठी राज्य सरकार हमी देणार आहे. हे कर्ज कोणत्या संस्थेकडून घ्यावे, याचे सर्वाधिकारही ‘एमएमआरडीए’कडे असणार आहेत.
‘एमएमआरडीए’कडे जबाबदारी
उत्तनपासून विरारपर्यंत सुमारे ५५.१२ किमी लांबीचा हा प्रकल्प आहे, ज्यामध्ये सागरी पूल आणि जोड रस्त्यांचा समावेश आहे. सेतू उभरणीची जबाबदारी ‘एमएमआरडीए’कडे आहे. सेतूमुळे मुंबईकडे जाणारा प्रवास वेळ व अंतर दोन्ही कमी होणार आहे.
प्रकल्पाचे फायदे :
- विरार ते मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत
- वाहतूक कोंडी व प्रदूषणात मोठी घट
- रोजगाराच्या नवीन संधी
- औद्योगिक व व्यावसायिक विकासाला चालना
- आपत्कालीन सेवा वेळेत पोहोचणार
- पर्यटन व सांस्कृतिक आदान-प्रदान वाढणार
- पर्यावरणपूरक उभारणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

