घणसोली माथाडी वसाहत पुनर्विकासावरून राजकीय संघर्ष

घणसोली माथाडी वसाहत पुनर्विकासावरून राजकीय संघर्ष

Published on

घणसोली माथाडी वसाहत पुनर्विकासावरून राजकीय संघर्ष
पुनर्विकास प्रक्रियेवर आरोप–प्रत्यारोप; समितीची भूमिका स्पष्ट
वाशी, ता. २६ (बातमीदार) : घणसोली येथील माथाडी कामगारांच्या हाउसिंग प्रकल्पांच्या पुनर्विकासावरून सध्या आरोप–प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, या विषयाला राजकीय संघर्षाची किनार दिली जात आहे. विशेषतः सिम्प्लेक्स सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेबाबत काही व्यक्तींमार्फत अपुरी व चुकीची माहिती पसरवली जात असून, ही माहिती पूर्णतः दिशाभूल करणारी व तथ्यहीन असल्याचा दावा पुनर्विकास समिती व संचालक मंडळाने केला आहे.
सोसायटीतील इमारतींवर आयआयटी खडगपूर आणि व्हीजेटीआय या नामांकित तांत्रिक संस्थांनी केलेल्या सखोल संरचनात्मक तपासणीत इमारती अत्यंत जीर्ण, जर्जर, अतिधोकादायक असून, मानवी वास्तीसाठी अयोग्य असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या जीविताच्या दृष्टीने पुनर्विकास प्रक्रिया तातडीने राबवणे अत्यावश्यक असल्याचे समितीने सांगितले.
श्री गुरुदेव दत्त सोसायटीचे अध्यक्ष संदीप लटांबळे यांनी स्पष्ट केले, की २०२१ ते २०२४ या कालावधीत सोसायटीच्या २० पेक्षा अधिक सभांमध्ये पुनर्विकासासंदर्भातील सर्व निर्णय महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० तसेच ४ जुलै २०१९ रोजीच्या शासन आदेशानुसार लोकशाही पद्धतीने आणि बहुमताने घेण्यात आले आहेत. सर्व सभांचे इतिवृत्त, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार अहवाल, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, टेंडर प्रक्रिया व अधिकृत पत्रव्यवहार सदस्यांसाठी पारदर्शकपणे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. समितीने हेही स्पष्ट केले, की संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एकाही सभासदाकडून कोणतीही रक्कम गोळा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सभासदांवर कोणताही आर्थिक धोका आलेला नाही. ३,२६४ घरांपैकी केवळ १० ते १५ सभासद पुनर्विकासाला विरोध करीत असून, उर्वरित सुमारे ९५ टक्के सभासदांनी या प्रक्रियेला पाठिंबा दिला आहे, असा दावा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com