भिवंडीत उड्डाणपुलावर ट्रकची दुचाकीस धडक
अपघातात मुलीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) ः शहरातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर बुधवारी (ता. २६) भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत सहावर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. खादिजा शेख असे मृत मुलीचे नाव असून वडील डॉ. उमर शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाड्याकडून नाशिकच्या दिशेने जाणारा ट्रक उड्डाणपुलावरून जात असताना हा अपघात झाला. डॉ. उमर शेख हे खादिजा हिला शाळेतून घरी घेऊन जात होते. या वेळी ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात खादिजा ट्रकच्या चाकाखाली आली. तर डॉ. उमर विरुद्ध दिशेने पडल्याने गंभीर जखमी झाले. वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ट्रकचालक सिराज कसुवर कुरेशी याला ताब्यात घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

