माणगाव आदिवासी वाडीतील कातकरी कुटुंबाला
आदिवासी कुटुंब दावणीला
उचल रकमेसाठी माणगाववाडीतील धक्कादायक प्रकार
कर्जत, ता. २६ (बातमीदार) ः तालुक्यातील माणगाव आदिवासीवाडीमध्ये राहणाऱ्या एका गरीब कातकरी कुटुंबावर अमानुष वागणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन बाळंतीण महिला आणि पाच मुलींना जबरदस्तीने पिकअप वाहनात बसवून वीटभट्टीवर नेण्यात आले. याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार बुधवार (ता. १९) ते शुक्रवार (ता. २१) दरम्यान घडला. दर्शन विजय मिरकुटे (वय २३) हा रोजंदारीवर मजुरी करतो. पत्नी प्रसूत झाल्याने काही दिवस कामावर येणार नसल्याचे त्याने काम देणाऱ्यांना सांगितले होते; मात्र समीर नजे आणि अब्दुल्ला नजे यांनी पूर्वी घेतलेल्या २७,५०० रुपये उचल रकमेसाठी मिरकुटेचे घर गाठले. तेव्हा तो घरात नव्हता. दोन बाळंतीण महिला, लहान बाळं, तसेच पाच मुली घरी होत्या. नजे यांनी महिलांना आणि मुलांना पिकअपमध्ये बसवले. पैसे परत द्या, नाहीतर बायका-मुलींना सोडणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.
--
कठोर कारवाई करा
मिरकुटे आई-वडील उचल रक्कम परत करण्यासाठी गेले असता, त्यांना हिणवून महिलांना परत देण्यास नकार दिला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्राची पांगे करीत आहेत. तर राहुल गायकवाड आणि शिवाजी ढवळे या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. दरम्यान, श्रमजीवी संघटनेने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

