एनटीसी गिरण्यांच्या जमीनीवर घरे बांधा

एनटीसी गिरण्यांच्या जमीनीवर घरे बांधा

Published on

एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवर घरे बांधा
संघर्ष समितीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः एनटीसीच्या सहा गिरण्यांच्या जमीन विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे घरे बांधण्याचे आदेश एनटीसीला द्यावेत, अशी मागणी गिरणी कामगार संघर्ष समितीने राज्य सरकारकडे केली आहे.
बॉम्बे डाइंग, न्यू ग्रेट मिलच्या तयार घरांची सोडत काढा. सहा गिरण्यांच्या  लहान प्लॉटची अदलाबदल करून सरकारच्या निर्णयाप्रमाणे एकत्र लालबाग येथे देण्यात येणारी घरे तातडीने बांधणी करून त्या त्या गिरण्यांच्या कामगारांना वाटप करा. खटाव मिल बोरिवली येथील ४० एकर जमिनीपैकी एकतृतीयांश जमीन व सेंच्युरी मिल येथील ४,७७८ चौरस मीटर  जमीन डीसीआर  ५८प्रमाणे ताब्यात घेऊन तिथे तातडीने घरबांधणीला सुरुवात करा. एनटीसीच्या सहा गिरण्यांच्या जमीन विकास नियमावलीप्रमाणे त्या जमिनीवर घरे बांधण्याचे आदेश एनटीसीला द्यावे. पात्रता निश्चितीच्या अर्जांचा घोळ व  त्यामुळे होणारा विलंब याबाबत  कामगार आयुक्त व म्हाडा यांना आदेश देऊन ती ही प्रक्रिया पूर्ण करा, या मागण्यांचे निवेदन आज सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांना गिरणी कामगार संघटनांच्या शिष्टमंडळाने दिले. शिष्टमंडळात गिरणी कामगार संघर्ष समितीचे प्रवीण घाग, प्रवीण येरूनकर, सेंच्युरी एकता मंचाचे नंदू पारकर, जितेंद्र राणे, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे जयप्रकाश भिलारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com