*दोन अल्पवयीन मुलींचा बालविवाह थांबविला..!*
दोन बालविवाह थांबविले
मुरबाड, ता. २६ (वार्ताहर ) : दोन १६ वर्षीय मुलींच्या विवाहाचा घाट घालण्यात येत होता. एका जागरूक नागरिकाकडून हे विवाह रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या दोन मुलींचे वय १६ असतानाच वडिलांनी लग्नाचा कार्यक्रम आखला. सर्वकाही ठरले. लग्नाच्या गाठीभेटी झाल्या. २३ नोव्हेंबरला हळदीचा कार्यक्रम होत असताना या प्रकाराची माहिती एका जागरूक नागरिकाने चाइल्ड हेल्पलाइन पुणे यांना दिली. बालकल्याण संरक्षण अधिकाऱ्यांसह मुरबाड तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या मदतीने हळदीच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. तसेच बालविवाह थांबवून मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या पालकाला बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालकाच्या चौकशीमध्ये खरी परिस्थिती समोर येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

