मुंबई उपनगरात संविधान दिन साजरा!

मुंबई उपनगरात संविधान दिन साजरा!

Published on

मुंबई उपनगरात संविधान दिन उत्साहात
चेंबूर, ता. २६ (बातमीदार) : मुंबई उपनगरातील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, विक्रोळी, कुर्ला आणि टिळक नगर या विभागांमध्ये बुधवारी (ता. २६) संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने तयार केलेला भारतीय संविधानाचा अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. विविध राजकीय, सामाजिक मंडळे, तसेच नेस्ट व सेव्ह सामाजिक संस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
मुंबई काँग्रेस मागासवर्गीय विभागातर्फे संविधान गौरव यात्रा काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्याला खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. वर्षा गायकवाड आणि अध्यक्ष रमेश मोकल यांनी संविधान प्रतींचे वाटप केले. या गौरव यात्रेत मुंबई काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष सुभाष भालेराव, माजी नगरसेविका वंदना गौतम साबळे, डॉ. प्रियतमा सावंत, राहुल वाघमारे, हिरजी बगडा, श्रीनिवास नायडू, रामवृक्ष चौधरी, मुकेश सकट, अभिषेक कांबळे, गणेश साळवी, अनिल कदम (पेंटर), संगीता भालेराव व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com