बदलापूरात उद्या मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार!
मुख्यमंत्री आज बदलापूरमध्ये
माउली चौक मैदानात जय्यत तयारी
बदलापूर, ता. २६ (बातमीदार) ः पालिका निवडणुकीत महायुतीचे घटक असलेले शिवसेना शिंदे गट आणि भाजपा-राष्ट्रवादी युती एकमेकांसमोर उभे ठाकल्याने स्थानिक राजकारण तापले आहे. आरोप–प्रत्यारोपांची मालिका रंगत असताना गुरुवारी (ता. २७) शहरातील पूर्वेकडील माउली चौक मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे.
सभेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी आणि सुरक्षा तैनाती करण्यात आली आहे. एक हजाराहून अधिक पोलिस कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. माउली चौक परिसरात वाहतूक नियंत्रणाचीही विशेष तयारी सुरू आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आयोजित करण्यात आलेल्या या सभेमुळे निवडणुकीचा प्रचार आणखी चुरशीचा होणार असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजपा-राष्ट्रवादी युती यांच्यातील थेट संघर्षाला सभेनंतर नवी दिशा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

