पोलिसांकडून ‘ओरी’ची सहा तास चौकशी

पोलिसांकडून ‘ओरी’ची सहा तास चौकशी

Published on

पोलिसांकडून ओरीची सहा तास चौकशी

घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) : दुबई अमली पदार्थ पार्टी प्रकरणात मुंबई पोलिसांनी बुधवारी समाजमाध्यम प्रभावक ओरी याची सुमारे सहा तासांहून अधिक काळ चौकशी केली. ओरी हा त्याचे वकील व बॉडीगार्ड यांच्यासोबत दुपारी सुमारे १ वाजता घाटकोपर येथील अँटिनार्कोटिक्स सेल कार्यालयात पोहोचला होता.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओरी याचा संबंध थेट दाऊदचा भाचा अली शाह पारकर याच्याशी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी हे लक्षात घेत ओरी याची चौकशी सुरू केली. ही चौकशी सलीम सोहेल शेख याच्या जबाबावरून करण्यात आली. पोलिसांनी अलीकडेच सलीम सोहेल शेख याला दुबईहून ताब्यात घेत भारतात आणले आहे. तो २०२२मध्ये सांगली जिल्ह्यात पकडलेल्या एका मोठ्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील फरारी आरोपी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com