३ डिसेंबरपर्यंत हरकती सूचना नोंदवता येणार, अंतीम यादी १० डिसेंबरला
हरकती, सूचनांसाठी मुदत वाढवली
आता ३ डिसेंबरपर्यंत वेळ; अंतिम यादी १० तारखेला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर मंगळवार, २५ नोव्हेंबरपर्यंत ७६९ हरकती, सूचना नोंद झाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने यासाठी असलेली २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आता ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. ५ डिसेंबरपर्यंत अंतिम यादी जाहीर केली जाणार होती; मात्र ही मुदतही १० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुदत वाढवल्याने प्रारूप यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यासाठी आता पुरेसा वेळ मिळणार आहे.
पालिकेची निवडणूक येत्या जानेवारीमध्ये होण्याची शक्यता असल्याने याबाबतच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून त्या ५ डिसेंबरला नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार होत्या; मात्र याद्यांमधील एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी असल्याचे समोर आले आहे. अनेकांची नावे दुसऱ्या ठिकाणी नोंद करण्यात आली आहेत. अशा त्रुटी असल्याने त्या दुरुस्त कराव्या लागणार आहेत. हरकती, सूचनांसाठी कमी दिवस मिळत असल्याने ही मुदत वाढवण्याची मागणी वाढल्यानंतर अखेर बुधवारी ही मुदत वाढवण्यात आली. दरम्यान, मागील सहा दिवसांत ७६९ हरकती, सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. मुदत वाढवल्याने हरकती सूचनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मतदारांसाठी मतदार याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
...
सर्वाधिक हरकती, सूचना
गोवंडी - २०४
मुलुंड - १२३
कुर्ला - ५६
माटुंगा - ४७
कांदिवली पूर्व - ३८
...
कमी हरकती, सूचना
भायखळा - एकही नाही
परळ - १
नाना चौक - २
कुलाबा - २
मालाड - ४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

