व्यक्तिमत्व हक्कांसाठी शिल्पा शेट्टीही उच्च न्यायालयात
व्यक्तिमत्त्व हक्कांसाठी शिल्पा शेट्टी न्यायालयात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचे तातडीने संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) टूल्स, डीपफेक तंत्रज्ञान आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे विनापरवानगी तिच्या छायाचित्रांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे.
आपल्या नावाचा, आवाजाचा कोणत्याही संमतीशिवाय व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याचा दावा शिल्पाने याचिकेत केला आहे. याचिकेत मेटा प्लॅटफॉर्म इंक., गुगल एलएलसी, एक्स कॉर्प., इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय (एमईआयटीवाय) आणि दूरसंचार विभाग (डीओटी) तसेच अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह एकूण २७ प्रतिवादी केले आहेत. शिल्पा शेट्टी अवॉर्ड शो-क्लायंट प्रमोशन पॅकेजेस नावाच्या एका कार्यक्रमामध्ये नाव, फोटो कोणत्याही परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचे नोव्हेंबर २०२५मध्ये निदर्शनास आले. हे कॉपीराइट कायद्याच्या कलम ३८ब अंतर्गत व्यक्तिमत्त्व, गोपनीय आणि नैतिक अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा शिल्पाने याचिकेत केला आहे. तिने याचिकेत हे प्रकार कायमस्वरूपी रोखण्याबाबतचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
...
मोठ्या प्रमाणात गैरवापर!
याचिकेनुसार, समाजमाध्यमांनी तिच्या चित्रपटांमधून जीआयएफ तयार करण्यासाठी काही क्लिप काढून तिचा आवाज, चेहऱ्याचे वैशिष्ट्य आणि क्लोन करण्यासाठी एआयचा वापर केला आहे. तसेच डीपफेक प्रतिमा आणि चित्रफिती, बनावट वस्तू, फसव्या जाहिराती, खोटे सदिच्छादूत समर्थन आणि यूट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर) व विविध ई-वाणिज्य संकेतस्थळे या व्यासपीठांवर शिल्पाच्या व्यक्तिरेखेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

