‘नॅक’कडे ‘विनाअनुदानित’ची पाठ
‘नॅक’कडे ‘विनाअनुदानित’ची पाठ
७५ टक्क्यांहून अधिक महाविद्यालयांची दर्जाबाबत दिरंगाई
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्य विद्यापीठ कायद्यानुसार प्रत्येक महविद्यालयांना नॅक मूल्यांकन आणि मानांकनाचा दर्जा घेणे बंधनकारक असताना राज्यातील दाेन हजार ३६८ विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ ६८९ महविद्यालयांनी दर्जा घेतला आहे, तर उर्वरित तब्बल एक हजार ६७९ म्हणजेच ७५ टक्क्यांहून अधिक महाविद्यालयांनी ‘नॅक’ला पाठ दाखवली आहे.
राज्यातील एक हजार २२५ अनुदानित महाविद्यालयांपैकी ३०४ म्हणजेच २५ टक्के महाविद्यालयांची ‘नॅक’ची पाच वर्षांची वैधता संपली आहे. दुसरीकडे अजूनही ४१ महाविद्यालयांनी म्हणजेच तीन टक्के महाविद्यालयांनी एकदाही नॅकसाठी अर्ज केला नसल्याची माहितीही उच्च शिक्षण विभागाच्या अहवालातून उघड झाली आहे. शासकीय महाविद्यालयांत २८ महाविद्यालयेही नॅकचा दर्जा घेण्यात आघाडीवर आहेत. २०३ महविद्यालयांनी ‘अ’ दर्जा, ६७ महाविद्यालयांनी ‘अ’ प्लस आणि २० महविद्यालयांनी ‘अ’ ट्रिपल प्लसचा दर्जा मिळवला आहे.
--
परिसस्पर्श योजनेकडेही दुर्लक्ष
राज्यातील प्रत्येक महाविद्यालयाने नॅकचा दर्जा घ्यावा, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परिसस्पर्श योजना मागील दोन वर्षांपासून सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे मार्गदर्शन, सहकार्य करण्यासाठी यंत्रणा राबवली जाते. त्याकडेही बहुसंख्य महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले आहे.
--
नॅकसाठी देशात प्रथम स्थान
राज्यात ११ अकृषी विद्यापीठांतर्गत शासकीय अनुदानित, विनाअनुदानित अशी तीन हजार ८५८ वरिष्ठ महाविद्यालये असून, यात ३० लाखांच्या दरम्यान विद्यार्थी शिक्षण घेतात. यात दाेन हजार ७४१ महाविद्यालये, संस्थांनी नॅक मानांकन आणि मूल्यांकन पूर्ण करून घेतले असून, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत नॅकसाठी राज्याचे स्थान देशात प्रथम आहे.
--
विनाअनुदानित महाविद्यालयांना नॅकचा दर्जा घेण्यासाठी स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठांनी यासाठी पुढाकार घेऊन संबंधित महाविद्यालयांना तो दर्जा घेण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा त्यांच्यावर विद्यापीठ कायद्यानुसार मान्यता काढून घेण्याची तरतूद आहे.
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

