बीएएमएस, बीएचएमएस प्रवेशांसाठी विशेष फेरी

बीएएमएस, बीएचएमएस प्रवेशांसाठी विशेष फेरी

Published on

बीएएमएस, बीएचएमएस प्रवेशांसाठी विशेष फेरी

मुंबई, ता. २६ ः राज्यातील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएसच्या (गट ब) नव्याने रिक्त असलेल्या जागांवरील प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने आयुषच्या गट ब अभ्यासक्रमांसाठी एक विशेष केंद्रीयकृत प्रवेश प्रक्रिया (कॅप) फेरी ४ जाहीर केली आहे. सीईटीकडून अशा प्रकारची अतिरिक्त फेरी पहिल्यांदाच सुरू करण्यात आली आहे. यासंबंधीचे परिपत्रक बुधवारी (ता. २६) जारी करण्यात आले. या अभ्यासक्रमांच्या रिक्त राहिलेल्या जागासंदर्भात एका विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या वर्षीच्या वैद्यकीय प्रवेशाच्या कट-ऑफमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी खुल्या प्रवर्गाचा कट-ऑफ गेल्या वर्षीच्या ६४२ वरून या वर्षी ५०३ गुणांपर्यंत खाली आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com