काँग्रेसच्या जिल्हाध्यपदी राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती
काँग्रेसच्या जिल्हाध्यपदी राजाभाऊ पातकर
महापौर बसविण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : काँग्रेसचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र पातकर यांना पाठविण्यात आले आहे.
आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून, घराघरात काँग्रेस पक्ष पोहोचविण्यासाठी काम करणार आहे. आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महापौर बसविण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल, असे राजाभाऊ पातकर यांनी सांगितले. पातकर यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपल्यासारख्या बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली. पक्षाने दिलेल्या या संधीचे सोने करणार आहे. काँग्रेसचा पंजा घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी जरी राजीनामा दिला असला तरी त्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे, असे या वेळी राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

