‘कूपर’मध्ये पालिकेचे 
९३ सुरक्षा रक्षक तैनात

‘कूपर’मध्ये पालिकेचे ९३ सुरक्षा रक्षक तैनात

Published on

‘कूपर’मध्ये पालिकेचे ९३ सुरक्षा रक्षक तैनात
खासगी सुरक्षा रक्षक हटवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : कूपर रुग्णालयात खासगी सुरक्षा रक्षकांना हटवून मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयासाठी ५० सुरक्षा रक्षकांची मंजुरी असतानाही वाढत्या गरजेनुसार ९३ रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व जण तिन्ही पाळ्यांत काम करणार आहेत. यामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यापूर्वी कार्यरत असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांकडून इतर कामेही करून घेतली जात असल्याची तक्रार होती. कमी मानधन आणि अस्थिर कामकाजामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदाऱ्या दिल्या जात हाेत्या. शिवाय खासगी सुरक्षा रक्षकांचे वय आणि प्रकृती बघता त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून ठेवणेदेखील जाेखमीचे होते. आता पालिकेचे सुरक्षा रक्षक तैनात झाल्याने केवळ सुरक्षेच्या कामावरच त्यांचे लक्ष राहणार आहे. शनिवारीच नवीन रक्षकांची प्रत्यक्ष तैनाती झाल्याने बाह्यरुग्ण विभागात सुरक्षा रक्षक दिसत नसल्याची आलेली तक्रार गैरसमज असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
कूपर रुग्णालयाचे वर्गीकरण आणि सेवा वाढल्याने सुरक्षाव्यवस्थाही मजबूत करणे आवश्यक होते. त्यामुळे अतिरिक्त रक्षक नेमणे गरजेचे ठरले. नवीन सुरक्षा रक्षकांना प्रत्येक मजल्यावर तसेच गर्दीच्या विभागांत तैनात करण्यात येणार आहे, असे पालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी सांगितले.
........................
एमएसएफ सुरक्षाही मिळणार
कूपर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाशी (एमएसएफ) तीन वर्षांचा करार करण्यात येणार असून, त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त व प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर एमएसएफचे सुमारे ६० जवान तैनात होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com