राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

Published on

विरार, ता. २७ (बातमीदार) : नालासोपाऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वसई-विरार शहर जिल्हातर्फे कार्यकर्ता मेळावा आज (ता. २७) पार पडला. जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी मुंबईमध्ये २६/११ च्या झालेल्या भ्याड बॉम्बस्फोटामध्ये शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे राज्यघटनेचे वाचन करण्यात आले. या मेळाव्यात विविध विभागांतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मेळाव्यात संघटन बांधणीसाठी चर्चा करण्यात आली. या वेळी इतर विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हा संपर्क मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला. मेळाव्यात संघटन विस्तार, स्थानिक समस्या, आगामी उपक्रमांची दिशा आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना झिरवाळ यांनी सांगितले की, पक्ष नेतृत्व आपल्या पाठीशी खंबीर उभे राहील. महापालिकेला सकारात्मक चर्चा होऊन कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिला जाईल. तसेच पक्षातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी जिल्हा सरचिटणीस अरविंद बेर्डे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी गुरव, युवक जिल्हाध्यक्ष मनीष परमार, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष महेंद्र लोखंडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष तमिष साळवी, समीर मिसाळ आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com