लोकशाही व्यवस्था प्रत्येकाच्या मनामध्ये असते तेंव्हा लोकशाही सुरक्षित राहते : डॉ .किरण सावे

लोकशाही व्यवस्था प्रत्येकाच्या मनामध्ये असते तेंव्हा लोकशाही सुरक्षित राहते : डॉ .किरण सावे

Published on

लोकशाही व्यवस्था प्रत्येकाच्या मनात रुजल्यास ती सुरक्षित राहते : डॉ. किरण सावे
पालघर, ता. २७ (बातमीदार) : शांततेने सत्तांतर होण्यामागे भारतीय राज्यघटनेची मुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजलेली आहेत. लोकशाही व्यवस्था प्रत्येकाच्या मनामध्ये असते, तेव्हाच लोकशाही सुरक्षित राहते, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र, इतिहास विभाग आणि संविधान जनजागृती समितीच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधान उद्दिष्टांचे वाचन आणि संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्दिष्टेचे वाचन आणि संविधान उद्देशिका प्रतिमा अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांच्यासह उपप्राचार्य महेश देशमुख, तानाजी पोळ, प्रा. रामदास येडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावे म्हणाले की, भारत १५ ऑगस्ट १९४७ नंतर राज्यघटनेच्या आधारावर एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला. आज आपण उपभोगत असलेले शिक्षण, व्यवसाय, आचार-विचार आणि धार्मिक स्वातंत्र्य ही सर्व राज्यघटनेची देणगी आहे. राष्ट्र ही सांस्कृतिक आणि व्यक्तीच्या मनातील संकल्पना आहे, जी एकसंघतेची भावना निर्माण करते. राज्यघटनेमुळेच आज देश वेगाने प्रगती करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com