मनोर ग्रामपंचायतीत ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता जनजागृती

मनोर ग्रामपंचायतीत ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता जनजागृती
Published on

जनजागृतीतून प्लास्टिकमुक्तीचा निर्धार
मनोर ग्रामपंचायतीचा ‘माझी वसुंधरा’ उपक्रम
मनोर, ता. २७ : शहरीकरणामुळे वाढलेल्या प्लॅस्टिक कचरा समस्येवर मात करण्यासाठी मनोर ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत स्वच्छता जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेत सुका कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देत प्लॅस्टिकमुक्तीचा निर्धार करण्यात आला.
अभियानादरम्यान मनोर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सुका कचरा गोळा करण्यासाठी विशेष पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या आवाहनानुसार, व्यापाऱ्यांनी जमा केलेला सुका कचरा स्वच्छता कर्मचारी दारात जाऊन गोळा करतील. ग्रामपंचायत अधिकारी नितीन पवार यांनी ही माहिती दिली. याशिवाय जिल्हा परिषदेमार्फत मनोर येथे उभारलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ग्रामपंचायतीने ताब्यात घेतला असून, लवकरच या प्रकल्पात गोळा केलेल्या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत गोळा केलेल्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाईल. प्लॅस्टिक कचरा पुनर्वापरासाठी विक्री केला जाणार असल्यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आहे. या जनजागृती अभियानात ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, स्वयंसेवी संस्था, व्यापारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
दरम्‍यान, मनोर ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे स्वच्छ भारत अभियानाला बळ मिळणार असून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन सरपंच, सदस्य आणि अधिकाऱ्यांनी केले आहे.
------------------------
प्लॅस्टिकबंदी आणि दंड
मनोर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना पर्यावरणास पूरक पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सिंगल युज प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्लॅस्टिक पिशवी वापरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com