कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह समर्थकांचा राजीनामा

कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह समर्थकांचा राजीनामा

Published on

कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच, काँग्रेसच्या विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण हे राजीनामे दिल्याचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले असले तरी या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेशाची मोठी चढाओढ दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली सचिन पोटे यांच्यासह शहराध्यक्ष विमल ठक्कर, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, प्रविण साळवे, वैशाली वाघ, मनीषा सरजीने, संकेत लोके, सचिन भटवेरा, लिओ मॅकेनरॉय आदी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

काँग्रेसशी एकनिष्ठ
आपल्या पदांचे हे राजीनामे देण्यामागे कोणतेही इतर राजकीय कारण नसून पक्षातील नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने आपण राजीनामा देत असल्याचे सचिन पोटे यांनी स्पष्ट केले. तर आमचे नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते संजय दत्त यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढेही आपली वाटचाल सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. इतक्या वर्षांपासून आपण काँग्रेस पक्ष आणि त्याच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहोत आणि यापुढेही आपली ही पक्षनिष्ठा कायम राहील. इतक्या कमी काळामध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर विश्वास दाखवत दिलेल्या विविध जबाबदाऱ्यांबाबत आपण त्यांचे नेहमीच ऋणी राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com