विद्याभवन हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
माझे संविधान, माझा अभिमान उपक्रम
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः विद्याभवन हायस्कूलमध्ये बुधवारी (ता. २६) संविधान दिनानिमित्त ‘माझे संविधान, माझा अभिमान’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे प्रभावी नियोजन मीनल भोळे व संगीता बोऱ्हाडे यांनी केले. नववीच्या विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व, नागरिकांची कर्तव्ये आणि भारतीय लोकशाहीविषयी माहितीपर सादरीकरण केले. या वेळी विद्यार्थ्यांनी संविधान गीत सादर केले. सर्वांनी एकत्र न संविधान प्रतिज्ञा घेतली. प्राचार्या योगिनी पोतदार यांनी संविधानामुळे प्राप्त हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यानिमित्ताने विविध वर्गांमध्ये स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे उपप्राचार्य ज्योती देसाई आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

