कचऱ्यात हरवलेले सोन्याचे दागिने मिळाले परत
कचऱ्यात हरवलेले सोन्याचे दागिने मिळाले परत
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
कल्याण, ता. २७ (बातमीदार) : पालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकतेचा उत्तम आदर्श घालून दिला आहे. कचऱ्यात हरवलेले सोन्याचे दागिने शोधून संबंधित महिलेला सुरक्षित परत केल्याने नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
चार/जे प्रभागक्षेत्र कार्यालय अंतर्गत जय शिव शंकर चाळीतील रहिवासी अंकिता मोरे यांच्या कानातील सोन्याचे दागिने सकाळच्या गडबडीत कचऱ्यात टाकले गेले. कचरा गाडीत दिल्यानंतर घरी येताच दागिने सापडत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पालिकेच्या घनकचरा विभागाशी संपर्क साधला. कंत्राटी अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता संबंधित कचरागाडी नूतन ज्ञान मंदिर शाळेच्या परिसरात असल्याचे समजले. यानंतर अधिकाऱ्यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांना कचरा संकलन बंद करून गाडी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अंकिता मोरे यांच्यासह कंत्राटी अधिकारी तेथील कर्मचाऱ्यांसह गाडीजवळ पोहोचले व शोधमोहीम सुरू करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी गाडीतील सर्व कचरा बाहेर काढून वेचून तपासला. भरलेल्या गाडीतून दागिने शोधणे कठीण काम बनले होते. यावेळी महिलेने त्यांच्या कचऱ्याच्या पिशवीत काही जुन्या लग्नाच्या पत्रिका असल्याची खून सांगितली. त्या माहितीच्या आधारावर शोध घेतला असता काही वेळातच पत्रिका असलेली पिशवी सापडली. त्यातच सोन्याचे दागिने मिळाले.
महिला झाली भावूक :
दागिने परत मिळताच अंकिता मोरे भावूक झाल्या. हे दागिने माझे आई-वडिलांनी बालपणी मी सातवीत असताना दिले होते, त्यामुळे त्यांच्याशी माझ्या भावना जोडल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकतेबद्दल त्यांनी आभार मानले. या घटनेमुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा व सामाजिक जबाबदारीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

