पाठिंब्यामुळे उमेदवारीला बळकटी

पाठिंब्यामुळे उमेदवारीला बळकटी

Published on

वाडा, ता. २७ (बातमीदार) : नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांना आज (ता. २७) राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट), तर शिवसेनेने (शिंदे गट) राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक १२ चे उमेदवार प्रफुल मुकुंद पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे उमेदवारीला बळकटी आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना यांची राज्यात नैसर्गिक युती असून आम्ही हेमांगी पाटील या शिवसेनेच्या कार्यक्षम उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे, असे वाडा तालुकाध्यक्ष जयेश शेलार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँगेसने नगराध्यक्षपदासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेना उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्र. २, ४, ५, ७, ९, १० या सात ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com