मद्यविक्रीवरील बंदी पायदळी

मद्यविक्रीवरील बंदी पायदळी
Published on

मद्यविक्रीवरील बंदी पायदळी
वहाळ गावातील रहिवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष
उलवे, ता.२७ (बातमीदार): वहाळ गावातील सेक्टर २३ इथे दारू विक्री खुलेआम सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत हे प्रकार सुरू असल्याने स्थानिक रहिवासी हैराण झाले असून उलवे नोड, वहाळ ग्रामपंचायत हद्दीतील ‘नो-लिकर झोन’चा निर्णय पायदळी तुडवण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी वहाळ ग्रामस्थांनी मतदानातून दारूबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाकाळानंतर याबाबतचे मोठे जनआंदोलन देखील उभारण्यात आली होती. अखेर वहाळ परिसरात दारु विक्रीवर बंदी घालण्यात आली. पण या आदेशांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. वहाळ परिसरात बाहेरील मद्यपींची गर्दी वाढली असून दारू पिऊन भांडणे, छेडछाडीचे गंभीर प्रकार होत दहशतीचे वातावरण आहे.
-------------------------------
जीवघेणा हल्ला
मित्रांसोबत सीएनजी भरायला जाणाऱ्या तरुणावर ८-१० मद्यधुंद तरुणांनी जीवघेणा हल्ला केला होता. तर तीन दिवसांपूर्वी चोरी देखील झाली होती
या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तसेच मद्यपींचा वावरामुळे महिलावर्गात देखील भीतीचे वातावरण आहे.
-----------------------------
नाराजीचा सूर
वहाळ ग्रामपंचायतीने नवी मुंबई पोलिस आयुक्त, सिडको कार्यकारी अभियंता, सिडको अतिक्रमण विभाग, दुय्यमनिरीक्षक, पनवेलचे राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. तसेच गावाने घेतलेला दारूबंदीच्या निर्णयाची पायमल्ली होत असल्याने नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com