कंटेनरच्या धडकेत प्रवासी रिक्षाचालकांचा मृत्यू
कंटेनरच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू
पडघा पोलिसांकडून चालक ताब्यात
पडघा, ता. २७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोईरपाडा गावाच्या हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरच्या जोरदार धडकेत एका रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृत रिक्षाचालक हे शरीफ महंमूद शेख (वय ३७, रा. अर्जुनली) हे गावातील रहिवासी होते. बुधवारी (ता. २६) सायंकाळी शरीफ शेख हे नेहमीप्रमाणे प्रवासी घेण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील हॉटेल शिवसागरच्या बाजूला असलेल्या बी.जी.आर. लॉजेस्टिक पार्कच्या गेटवर रिक्षाबाहेर उभे होते. त्याच वेळी शिवसागर हॉटेलच्या बाजूकडून विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या एका छोट्या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक शरीफ यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा गुन्हा पडघा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले आहे. मृतदेहाचे पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पडघा पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

