वाशी गावातील मार्केटच्या आरक्षित भूखंडाचा प्रश्न अधांतरीत

वाशी गावातील मार्केटच्या आरक्षित भूखंडाचा प्रश्न अधांतरीत

Published on

वाशी गावातील मार्केटच्या आरक्षित भूखंडाचा प्रश्न अधांतरीत
तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : वाशी गाव व सेक्टर ३१ परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी राखीव असलेला मार्केटचा भूखंड अद्याप सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा भूखंड तत्काळ हस्तांतरित करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दशरथ भगत यांनी तत्कालीन नगरसेवकपदाच्या कार्यकाळात या विषयाबाबत सिडको व महापालिका प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. या भूखंडावर दैनंदिन भाजी, मासळी व किरकोळ बाजारासाठी तसेच सामाजिक उपयोजनासाठी बहुउद्देशीय इमारत उभारावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र सिडकोच्या कथित दुर्लक्षामुळे आणि समन्वयाच्या अभावामुळे हा विषय आजही प्रलंबित आहे, असा आरोप त्यांनी केला. २०२२ रोजी माजी नगरसेविका फशीबाई भगत यांनीही या संदर्भात पुन्हा पत्रव्यवहार केला होता. महापालिकेच्या शहर विकास आराखड्यातदेखील या भूखंडावर मार्केट उभारण्याची नोंद करण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनीदेखील सिडको व्यवस्थापकीय संचालक व महापालिका आयुक्तांना तात्काळ निर्णय घेण्याचे लेखी व तोंडी निर्देश दिले होते.
.....................
या परिसरात एकूण चार भूखंड असून त्यापैकी ५०० चौ. मी. क्षेत्रासाठी पूर्वी महावितरण ट्रान्सफॉर्मरसाठी आरक्षण होते. मात्र त्यासाठी पर्यायी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे हा भूखंड तात्काळ मार्केट व बहुउद्देशीय वास्तूसाठी हस्तांतरित करावा किंवा सिडकोनेच इमारत उभारावी, अशी जोरदार मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com