अपक्ष उमेदवारांना चिन्हासह प्रचाराला चारच दिवस

अपक्ष उमेदवारांना चिन्हासह प्रचाराला चारच दिवस

Published on

पालघर, ता. २७ (बातमीदार) : पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २६) चिन्हांचे वाटप व अधिकृत उमेदवारांची यादी निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. अधिकृत राजकीय पक्षाला आधीच चिन्ह माहीत असल्याने उमेदवारांनी आधीपासूनच मतदारांपर्यंत प्रचाराला सुरुवात केली होती. अपक्ष उमेदवारांना मात्र चिन्हांचे वाटप केल्यानंतर अधिकृत चिन्ह मिळाल्यावर त्यांना फक्त मतदारापर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी तीन दिवस उरलेले आहेत.

नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात असून, १५ प्रभागांतील ३० सदस्यांसाठी ११५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, गावपाड्यात रात्रीच्या वेळी जोरात पार्ट्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालघरमधील बहुसंख्य प्रभागांमध्ये तिरंगी लढती आहेत. यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये लढती होणार आहेत. काही प्रभागांमध्ये चौरंगी तसेच पंचरंगी लढतीही आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे, गट व ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट व शरद पवार गट) यांच्या उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत. अतिशय चुरशीच्या लढती होणार असल्याने कोण निवडून येईल, हे अद्याप अंदाज व्यक्त करता येत नाही.

३० सदस्य पदांसाठी ११५ उमेदवार रिंगणात
नगर परिषदेमध्ये एकूण १५ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. एकूण ३० सदस्यांची निवड होणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाने प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे केले असून, त्यांनी प्रत्येकी ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे २३, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चार, काँग्रेस सहा, अपक्ष नऊ असे एकूण ३० सदस्य पदांसाठी ११५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com