सेल्फी पॉईंट भिकाऱ्यांचा अड्डा

सेल्फी पॉईंट भिकाऱ्यांचा अड्डा

Published on

सेल्फी पॉइंट भिकाऱ्यांचा अड्डा
पालिकेकडून लाखो रुपये खर्चून पर्यटनस्थळ दुरवस्थेत
कांदिवली, ता. २७ (बातमीदार) : कांदिवली पश्चिमेकडील महावीरनगर परिसरात पालिकेकडून लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंट सध्या भिकारी आणि बेघर व्यक्तींचा निवारा बनला आहे. यामुळे या आकर्षक पर्यटनस्थळाचे सौंदर्य आणि उद्देश पूर्णपणे नष्ट झाला असून, नागरिकांनी पालिकेच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
माजी नगरसेविका प्रियांका मोरे यांच्या विकास निधीतून चारकोप-पोईसर लिंक रोडवर कमला विहार स्पोर्टस क्लबजवळ हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. सुरुवातीला येथे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक सेल्फी घेण्यासाठी गर्दी करीत होते; मात्र गेले कित्येक महिने रस्त्यावर भीक मागणाऱ्या आणि बेघर व्यक्तींनी या पॉइंटवर बस्तान मांडले आहे. भिकारी येथे आपला संसार थाटून राहतात आणि दैनंदिन व्यवहारदेखील तिथेच करतात. यामुळे पॉइंटवर घाण आणि अस्वच्छता पसरली आहे. यामुळे नागरिक आणि तरुणांनी या ठिकाणाकडे पाठ फिरवली आहे. लाखो रुपये खर्च करून तयार केलेला हा महत्त्वाचा पॉइंट आता केवळ भिकाऱ्यांचा अड्डा बनला आहे. या मार्गावर प्रचंड रहदारी असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पालिकेने तातडीने या भिकाऱ्यांना हटवून परिसराची स्वच्छता करावी आणि नागरिकांसह प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
------------------------
रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या या नागरिकांमुळे प्रवासी आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. सेल्फी पॉइंटवर जाता येत नाही. पालिकेने तातडीने त्यांच्यावर कारवाई करून सेल्फी पॉइंट स्वच्छ करावा.
- प्रमोद घाग, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com