देशी पिस्तूल, जिवंत काडतूसासह तरुण जेरबंद

देशी पिस्तूल, जिवंत काडतूसासह तरुण जेरबंद

Published on

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : उल्हासनगरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सुरू असलेल्या पोलिसांच्या कडक मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सेंच्युरी ग्राउंड, डॉल्फिन क्लबजवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन फिरणाऱ्या एका संशयितावर उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ ने सापळा रचत ताब्यात घेतले. कंबरेत खोचून ठेवलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह त्याला पकडल्याने शहरातील अवैध शस्त्र रॅकेटवर पोलिसांनी मोठा आघात केला आहे.
उल्हासनगर गुन्हे शाखा घटक कार्यालयातील पोलिस हवालदार सुरेश जाधव यांना, एक व्यक्ती अवैध अग्निशस्त्र घेऊन शहाड फाटक रोडवरील सेंच्युरी ग्राउंड, डॉल्फिन क्लब परिसरात येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तत्काळ तयार करण्यात आले. दोन पंचांच्या उपस्थितीत या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. काही वेळातच संशयित व्यक्ती दिसला. चौकशीदरम्यान त्याचे नाव शाहिद अल्लबक्ष सय्यद (वय २०) असे समोर आले. अंगझडतीत कंबरेत खोचून ठेवलेले २५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शाहिदविरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com