अखेरच्या टप्प्यात प्रचार शिगेला
अखेरच्या टप्प्यात प्रचार शिगेला
उमेदवारांची घरोघरी भेट; कार्यकत्र्यांची फौज कामाला
अलिबाग, ता. २७ वार्ताहर ः रायगड जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत आता आणखीनच वाढत आहे. प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला असून उमेदवार विजयासाठी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची फौजच कामाला लागली आहे. विविध प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांमार्फत पत्रके वाटली जात आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांना निवडणुकीसाठी चिन्हांचेही वाटप करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमिवर राजकीय उलथापालथ झाल्याचे पहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातही शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले वाद आता उफाळून आले आहेत. जिल्ह्यातील महाड, पेण, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजप युती झाली आहे, तर अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माथेरान, खोपोलीमध्ये शिवसेना आणि भाजप युती झाली आहे. मुरूडमध्ये महायुतीचे घटक पक्ष हे वेगवेगळे लढत आहेत. उरण नगर परिषदेमध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे नगर परिषदांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
................
चैकट:
अलिबागमध्ये प्रचारात सासू- सुन समोरासमोर
अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढत आहेत. त्यांच्याविरोधात शेकाप, काॅंग्रेस महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. शिवसेना- भाजपने थेट नगराध्यक्षपदासाठी तनुजा पेरेकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या उतरल्या आहेत. तर शेकापकडून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या ज्येष्ठ कन्या व आमदार महेंद्र दळवी यांच्या स्नुषा अदिती दळवी या प्रचारासाठी उतरल्या आहेत. त्यामुळे प्रचाराच्या रिंगणात सासू-सून एकमेकांविरोधात उभ्या असल्याचे पहायला मिळत आहे.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

