केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वडोदरा–मुंबई द्रुतगती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वडोदरा–मुंबई द्रुतगती

Published on

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा रद्द

तलासरी, ता. २७ (बातमीदार) ः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या गुजरात ते महाराष्ट्र टप्प्यातील पाहणी दौरा गुरुवारी (ता. २७) रद्द करण्यात आला. तलासरी तालुक्यातील सावरोली इंटरचेंज आणि टप्पा क्रमांक आठ ते १० या महत्त्वाच्या भागांची पाहणी करण्यासाठी गडकरी येणार होते; मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने हेलिपॅडवरून उड्डाण घेता न आल्यामुळे दौरा रद्द करण्यात आला.
मुंबई-वडोदरा सुपर एक्स्प्रेस वेवरील सावरोली इंटरचेंज सर्कल काम अंतिम टप्प्यात आहे. येथून मुंबई आणि गुजरात या दोन्हीकडे जोडणी सुलभ होणार आहे. गडकरी हे या बांधकाम प्रगतीचा आढावा घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत चर्चाही करणार होते. तलासरी तालुक्यातील इभाडपाडा येथे टप्पा क्रमांक १० वर खास हेलिपॅड तयार करण्यात आले होते. जिथून गडकरी पाहणीसाठी निघणार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com