उरणच्या विकासासाठी जनतेचा भाजपला पसंती

उरणच्या विकासासाठी जनतेचा भाजपला पसंती

Published on

उरणच्या विकासासाठी जनतेचा भाजपला पसंती
उरणचे आमदार महेश बालदी यांचा विश्वास
उरण, ता. २७ (वार्ताहर) : उरण शहराचा सर्वांगीण विकास हा आपला ध्यास असल्याचे स्पष्ट करत उरणला एक सुंदर, आधुनिक आणि आदर्श शहर बनविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असा ठाम विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला. उरण-बोरी येथे आयोजित व्यापारी वर्गाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत आमदार बालदी यांनी सांगितले की, आम्ही सत्तेत असताना उरण शहरातील बहुतेक महत्त्वाची विकास कामे मार्गी लावली आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, नगरपरिषदेची अद्ययावत प्रशासकीय इमारत, टाऊन हॉलचे सुरू असलेले काम ही त्याचीच उदाहरणे आहेत. तसेच, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असलेला बायपास मार्ग येत्या पावसाळ्याआधी पूर्ण करून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिवसेना (उबाठा) नेते मनोहर भोईर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत मुख्यमंत्री असताना जे उरणसाठी काहीही करू शकले नाहीत, त्यांनी आज आम्हाला विकासाबाबत बोलू नये, असे परखड मत व्यक्त केले. नागरिकांना दिलेल्या सुविधा, पायाभूत सुविधा आणि शहरातील नवीन प्रकल्पांमुळेच भाजपला जनतेचा सतत पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. उरणमधील व्यापारी वर्ग हा नेहमीच भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचे उल्लेख करत, व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम आम्ही प्राधान्याने केले आहे. त्यामुळे यावेळीही व्यापारी बांधवांचा आम्हालाच पाठिंबा मिळेल, असा विश्वास आमदार बालदी यांनी व्यक्त केला. तसेच, आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा यांच्यासह सर्व २१ नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com