रेल्वे डब्यात मॅगी बनवणाऱ्या महिलेचा माफीनामा; माझ्याकडून चूक झाली, तुम्ही टाळा
रेल्वेत मॅगी बनवणाऱ्या महिलेचा माफीनामा
माझी चूक झाली; तुम्ही अशी चूक करू नका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात इलेक्ट्रिक किटली वापरून चहा आणि मॅगी तयार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला प्रवासी सरिता लिंगायत यांनी आता माफीचा नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आई कधीच लेकरांना इजा पोहोचवणार नाही, माझ्याकडून चूक झाली, तुम्ही अशी चूक करू नका, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
हा माफीनामा त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून सोमवारी पोस्ट करण्यात आला. २० नोव्हेंबरला इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेने रेल्वे कायदा कलम १४७ (१) अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. घटनेबाबत स्पष्टीकरण देताना सरिता लिंगायत यांनी सांगितले, की दीड-दोन महिन्यांपूर्वी आम्ही केदारनाथ-बद्रिनाथ यात्रेला गेलो होतो. परतीच्या प्रवासात हरियाना ते पुणे असा रेल्वे प्रवास सुरू होता. त्या दिवशी एकादशी असल्याने आमच्यासोबत असलेल्या रुग्णाला गरम पाण्याची गरज होती. चार्जिंग प्लगमधून किटलीला जोड देऊन मी पाणी गरम केले. तेव्हाच डब्यातील एका प्रवाशाने खडीसाखर टाकून चहा बनवण्याची विनंती केली. त्यांनी तयार केलेला चहा सहा-सात प्रवाशांनी वाटून घेतल्याचे त्यांनी सांगितले. पुढे एका छोट्या मुलीने मॅगी करून देण्याची विनंती केली. किटलीत थोडी मॅगी शिजवून तिला दिली. नंतर ते मूल निघून गेले. त्याच क्षणी काढलेला छोटा व्हिडिओ मी इन्स्टाग्रामवर टाकला. यात माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता, असेही सरिता लिंगायत यांनी सांगितले.
...
सूचना लावणार
केंद्र सरकारने चार्जिंग पॉइंटजवळ स्पष्ट सूचना लावण्याचा निर्णय घेतला आहे. माझा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविषयीही मला राग नाही. चुकीतून शिकायला मिळते. आईकडून चूक झाली, लेकरांकडून होऊ नये, म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे, असे सरिता यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

